प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) कुकडेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस दुर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य इंजिनिअर विशाल वि-होळकर यांच...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
कुकडेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस दुर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य इंजिनिअर विशाल वि-होळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेची गरज ओळखून शाळेस दोन ग्रीन व व्हाईट बोर्ड भेट देण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.अशी माहीती मुख्याध्यापक चंद्रकांत पारधी यांनी दिली.
म-हट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य इंजि.अमोल ढोबळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यापूर्वी देखील या संस्थेच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तर,पाटी,वह्या,पेन,पेन्सिल, कंपासपेटी इ.चे वाटप करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी पूर शिरोली गावच्या सरपंच उषाताई चिमटे,उपसरपंच ताराचंद दिवटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप दिवटे,माजी मुख्याध्यापक दुंदा दिवटे ,इंजि.समर्थ पाटील ,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सचिन मुळे यांनी केले.आभार मुख्याध्यापक चंद्रकांत पारधी यांनी मानले.
COMMENTS