हडपसर येथील सार्वजनिक स्वच्छतागृह व सुलभ शौचालयांचीआतिशय बिकट अवस्था झाली असून महिला स्वच्छतागृहांची,सुलभ शौचालयांची संख्या अपुरी आहे जे दोन...
हडपसर येथील सार्वजनिक स्वच्छतागृह व सुलभ शौचालयांचीआतिशय बिकट अवस्था झाली असून महिला स्वच्छतागृहांची,सुलभ शौचालयांची संख्या अपुरी आहे जे दोन सुलभ शौचालयं आहेत त्यांची भयाण अवस्था असल्याने हडपसर परिसरात एकही असे स्वच्छतागृह नाही की त्याला स्वच्छतागृह म्हणावे.. सर्व स्वच्छतागृह दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य पहायला मिळत आहे तरी यावर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
प्रमुख मागण्या...-
स्वच्छतागॄहांची संख्या वाढवणे, असलेल्या स्वच्छतागॄहांची दुरुस्ती करणे, दुरूस्ती अभावी बंद असलेले स्वच्छतागृह सर्व सुविधा उपलब्ध करून नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत. महिला स्वच्छतागॄहांची संख्या वाढवणे, नियमित स्वच्छता ठेवणे,पाण्याची लाईटची व्यवस्था करणे, महिला सुलभशौचालयांना देखभालीसाठी नेमणूक करणे किंवा केअर टेकर नेमणे. आज यासंदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी तसेच प्रभावीरीत्या अंमलबजावणी होण्यासाठी सहायक आयुक्त ढवळे पाटील यांना मागणीचे पत्र देण्यात आले.
यावेळी बाळासाहेब भोंडवे, दत्ता खडपेकर, विलास शेलार, हिरा अग्रवा व उपस्थित होते.
COMMENTS