सहसंपादिका : प्रतिभा किर्तीकर्वे. दादर मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र आयोजित प्रथम वर्धापन दिन, स्नेह भेट तथ...
सहसंपादिका : प्रतिभा किर्तीकर्वे.
दादर मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र आयोजित प्रथम वर्धापन दिन, स्नेह भेट तथा कविसंमेलन तथा पुरस्कार वितरण सोहळा दादर मुंबई येथे रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कविसंमेलनाचे अध्यक्ष भिमराव यशवंत आंबेडकर तर कविसंमेलनाध्यक्ष बबन सरवदे हे होते.
यात प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विनोद जाधव समूह सल्लागार, नरेंद्र अनंत पवार अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र, उपाध्यक्षा माला मेश्राम , सचिव अनिल सावंत हे होते.
त्याचप्रमाणे कल्पना टेंभूर्णीकर, प्रा. नानाजी रामटेके डॉ.हरिश्चंद्र धिवार, अर्चना चव्हाण, सुभाष मानवटकर, राजीव खंडारे, डॉ.मधूकर दिवेकर, गणेश मोरे इत्यादी प्रामुख्याने हजर होते.
दुपारच्या सत्रात कविसंमेलन घेण्यात आले यात जवळपास पस्तीस कवी कवयित्री यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गायकवाड खंडारे, कांचन लांजेकर यांनी प्रास्ताविक यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.नानाजी रामटेके यांनी केले.
COMMENTS