प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) मंचर दि.४ जानेवारी निघोटवाडी, मंचर येथील चिंचपुरेमळा येथे मुंजोबा महाराज भंडारा कार्यक्रम आयोजित करण्यात ...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
मंचर दि.४ जानेवारी
निघोटवाडी, मंचर येथील चिंचपुरेमळा येथे मुंजोबा महाराज भंडारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी किर्तनकार हभप आदेश महाराज पिंगळे यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर भाविक भक्तांना मुंजोबा देवाचा प्रसाद म्हणून भंडारा ठेवण्यात आला होता.किर्तन व भंडारा या दोन्हींचा भाविक भक्तांनी लाभ घेतला.यावेळी प्रा.अनिल निघोट, सरपंच नवनाथ निघोट, घोडेगाव ग्रा.पं.सदस्य सुनिल ईंदोरे, निघोटवाडी ग्रा.पं सदस्य ऊषा चिंचपुरे, वहातुक सेना तालुका प्रमुख संजय चिंचपुरे,नथुभाऊ जगदाळे, बाळासाहेब निघोट, सिद्धेश चिंचपुरे, प्रिंटिंग प्रेस चे संजय चिंचपुरे , माऊली चिंचपुरे, नवनाथशेठ निघोट, मच्छिंद्र निघोट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS