जुन्नर प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील जुन्नर नगर पालिका हद्दीतील बेघर लोकांना घरकुल मिळावे या साठी R.P.I रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची ...
जुन्नर प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील जुन्नर नगर पालिका हद्दीतील बेघर लोकांना घरकुल मिळावे या साठी R.P.I रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची मातृभूमी बेघर आघाडी संघटना, प्रहार बेघर महीला संघटना व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप यांच्या वतीने जुन्नर नगर पालिका हद्दीतील बेघर लोकांना घरकुल मिळावे यासाठी मागील ४० वर्षांपासून बेघर महीला घरकुलाकरीता आंदोलन, मोर्चा,उपोषण, आमरण उपोषण केले. अनेक वेळा नगर पालिका, नगराध्यक्ष, तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस, मंत्रालय, आमदार, खासदार साहेब यांच्याबरोबर अनेक वेळा पत्र व्यवहार केले, तसेच समक्ष भेट घेऊन चर्चा केली पण काहीही उपयोग झाला नाही.
राजकिय नेते मतदानाच्या वेळी प्रत्येक वेळी आश्वासने देत आहेत तरी अजूनही बेघर लोकांना घरकुल मिळाले नाही, या बाबत जुन्नर नगर पालिके कडून दिनांक ११/०१/२४ रोजी मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी R.P.I चे जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट राक्षे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे, प्रहार बेघर महीला संघटनाचे व श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अरूण शेरकर अध्यक्ष याच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर शहरातील बेघर घरकुल बाबत जुन्नर नगर पालिके मध्ये प्रशासकीय अधिकारी संदिप भोळे मुख्याधिकारी यांची नगर पालिकेमध्ये जावून भेट घेऊन चर्चा केली असता या वेळी पंचलिग झोपडपट्टी, रोकडे मारूती झोपडपट्टी व बेघर महीला ग्रुप यांनी मागील ४० वर्षापासून घरकुलाकरीता लढत असून घरकुल कधी मिळणार आहे? म्हणून विचरणा केली व पंचलिग झोपडपट्टीत पिण्याचे पाणी, रस्ते, लाईट, शौचालयाचे नळ दुरूस्ती व पाणी व कचरा या बाबतीत महीला व नागरीक आक्रमक झाले. या वेळी संभाजी साळवे यांनी घरकुल जागेच्या संदर्भातील विविध प्रश्न उपस्थित केले. मुख्याधिकारी यांना माहिती दिली तसेच प्रहार संघटनेचे दिपक चव्हाण यांनी नगर पालिकेकडून पत्र व्यवहार केल्यावर संघटनेला नगर पालिकेकडून कोणत्याही पत्राचे उत्तर दिले जात नाही या कडे लक्ष वेधून घेतले. बेघर लोकांना घरकुल दयावे म्हणून जुन्नर शहरातील सर्व बेघरांना लवकर घरकुल दयावे व जुन्नर नगर पालिका हद्दीतील सर्व बेघर संघटनाचे पदाधिकारी यांची मिटिंग घेऊन घरकुल दयावे म्हणून मागणी केली या वेळी संदिप भोळे मुख्याधिकारी जुन्नर नगर पालिका यांनी सविस्तर माहिती दिली व झोपडपट्टीतील स्वच्छता, लाईट पाणी रस्ते या बद्दल सर्व संबंधित अधिकारी यांना बोलवून ताबडतोब सर्व सुविधा तातडीने दयावी म्हणून आदेश दिला व लवकरच बेघर संघटनांचे पदाधिकारी य़ची मिटिंग घेऊन घरकुलांचे प्रश्न सोडवण्यात येतील तसेच बेघर लोकांना घरकुलाकरीता बिल्डर, सर्व नॅशनल बॅंकचे मॅनेजर व पदाधिकारी यांची मिटिंग घेण्यात येईल असे अश्वासन दिले. या वेळी पोपट राक्षे यांनी मुख्याधिकारी यांचे व उपस्थित बेघर महीला व पदाधिकारी चे आभार मानले
यावेळी R.P.I चे संभाजी साळवे, पोपट राक्षे अध्यक्ष, सुरेश खरात उपाध्यक्ष, प्रवीण लोखंडे युवा अध्यक्ष, तारा वंजारी, सुमन वायकर, बेबी जाधव, प्रहार बेघर संघटना व श्री राधेश्यामचे दिपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष अरूण शेरकर अध्यक्ष रजनी शहा उपाध्यक्षा शमिम सय्यद व महीला मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS