ओतूर दि.९ : पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) येथील धरणात अनोळखी पुरुषाचा मृतदेह पारगावतर्फे मढ गावाच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ गुरुवारी (दि. ७) सा...
ओतूर दि.९ : पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) येथील धरणात अनोळखी पुरुषाचा मृतदेह पारगावतर्फे मढ गावाच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ गुरुवारी (दि. ७) सायंकाळी आढळून आला.
याबाबत ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी माहिती दिली की, गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पारगावतर्फे मढ येथे स्मशानभूमीजवळ पिंपळगाव जोगा धरणाच्या पाण्यात मासेमारी करणाऱ्या स्थानिक लोकांना मासेमारी करत असताना एका पुरुषाचा मृतदेह काटेरी झुडपाला अडकून पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो कुजलेल्या स्थितीत मिळून आला. याबाबत सीतेवाडीचे पोलिस पाटील विक्रम मोजाड यांनी ओतूर पोलीसात खबर दिली आहे.
या अनोळखी मृतदेहाची ओळख पटलेली नाही. हा पुरुष जातीचा व्यक्ती अंदाजे ५० ते ५५ वयाचा असून, त्याच्या अंगामध्ये राखाडी रंगाची फूल पॅन्ट, पॅन्टच्या खिशात मळकट पांढरे रंगाचा हातरूमाल, शान कंपनीची अंडरवियर असून, गळ्यात ऑक्सिजन उपचाराची नळी व त्यास हॉस्पिटलची पांढरे रंगाची नळी लावलेली आहे. याबाबत कोणास माहिती असल्यास ओतूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन ओतूर पोलिसांनी केले आहे.
COMMENTS