साप्ताहिक उद्याचा शिलेदार प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा... | CrimeNama
Loading ...

साप्ताहिक उद्याचा शिलेदार प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा...

  बोतार्डे : जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे गावातील प्रा.सतिश संतोष शिंदे यांच्या शासनमान्य RNI TC. NO-51774 या साप्ताहिक उद्याच...

 


बोतार्डे : जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे गावातील प्रा.सतिश संतोष शिंदे यांच्या शासनमान्य RNI TC. NO-51774 या साप्ताहिक उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाचा प्रथम वर्धापन दिन मंगळवार दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.



या कार्यक्रमप्रसंगी सकाळी ११ वाजता कार्यक्रम‍ाचे उद्घाटन व महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना साप्ताहिक उद्याचा शिलेदारचे मुख्य संपादक प्रा.सतिश संतोष शिंदे यांनी मनोगतामधून मांडत आजपर्यंतचा साप्ताहिकाचा खडतर प्रवास व अनुभव व २२ अंक कशाप्रकारे वर्षभरात काढले व पुढील वाटचाल कशाप्रकारे असेल तसेच शुभेच्छा त्यांनी यावेळी देत आलेल्या सर्व मान्यवर व कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन मरभळ यांचे ऋण व्यक्त केले.



यानंतर प्रतिभा भिकाजी किर्तीकर्वे संपादिका यांनी आपले मनोगत व्यक्त करून साप्ताहिक उद्याचा शिलेदारची पार्श्वभूमी सांगून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, डॉ.खंडू माळवे ( ज्येष्ठ साहित्यिक ) यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदारला शुभेच्छा देत असताना म्हणाले की, सतिश शिंदे यांनी अतिशय ग्रामीण भागात हे साप्ताहिक सुरू केले असून एक ऐतिहासिक नांदी भविष्यकाळासाठी असणार व त्यांना राज्यशासन व देशपातळीवरील मदतीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, पोपट राक्षे ( RPI अध्यक्ष जुन्नर तालुका ) म्हणाले की साप्ताहिक उद्याचा शिलेदार व त्याचे संपादक सतिश शिंदे प्रतिभा किर्तीकर्वे व प्रशांत धोत्रे आयोजक यांना शुभेच्छा देत असताना साप्ताहिक उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाला खरोखर जुन्नर तालुका व राज्य पातळीवर पोहोचवण्याचं काम यापुढे आपण करून पुढचा द्वितीय वर्धापन दिन हा जुन्नर तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना अगोदर आपण साजरा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले, संभाजी साळवे जेष्ठ समाजसेवक यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदार व आयोजकांना शुभेच्छा दिल्या व या पत्रकाला खरोखर मदतीची गरज असून भविष्यकाळासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असे त्यांनी सांगितले.



नंदिनी ताई सुकाळे मॅडम यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदार साप्ताहिक व आयोजकांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा देऊन चांगली वाटचाल व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.



तसेच प्रशांत धोत्रे यांनी देखील आपले मनोगत मांडत असताना उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाला जी काही मदत लागेल ती आपण सर्वजण मिळून भविष्यात करूया असा मानस त्यांनी यावेळी बोलताना केला, त्याचप्रमाणे पोपटराव वाघमारे माजी ए. एस. आय. पुणे ग्रामीण व डॉ.विशाल आमले यांनीदेखील साप्ताहिक उद्याचा शिलेदारला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या व जी काही मदत लागेल ती आपण करण्यासाठी तयार आहोत असे त्यांनी बोलताना सांगितले, नारायणजी पवार पोलीस निरिक्षक जुन्नर यांनी कार्यक्रमप्रसंगी भेट देऊन साप्ताहिक उद्याचा शिलेदार व आयोजकांना शुभेच्छा दिल्या व साप्ताहिकाचे दैनिक व्हावे तसेच आपली उत्तरोत्तर प्रगती होवो व आपल्या हातची लेखणी धारदार व्हावी अशाप्रकारच्या शुभेच्छा दिल्या यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन मरभळ क्रृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जुन्नर व विद्यमान ग्रा.पं.सदस्य यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाला शुभेच्छा दिल्या व आपण अशीच प्रगती करावी अशी मनोमन इच्छा व्यक्त केली.



या कार्यक्रमासाठी ट्रॉफी सौजन्य अर्जुन जाधव, लाईफ फाऊंडेशन अध्यक्ष यांनी केले तर स्नेहभोजन जनार्दन मरभळ क्रृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांनी सहकार्य केले या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले. सर्व सन्मानार्थी व उपस्थित मान्यवरांचे ट्रॉफी, सन्मानपत्र व गुलाबपुष्प व पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमप्रसंगी साप्ताहिकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

या कार्यक्रमाला पांडूरंग डावखर माजी सरपंच, गुलाब आमले तंटामुक्ती अध्यक्ष, चैतन्य घोडे उपाध्यक्ष, पोपट राक्षे आर.पी.आय अध्यक्ष सुरेश खरात आर.पी.आय उपाध्यक्ष, संभाजी साळवे जेष्ठ समाजसेवक, डॉ.खंडू माळवे जेष्ठ साहित्यिक, पोपट वाघमारे माजी ए.एस.आय पुणे ग्रामीण, नारायणजी पवार साहेब पोलीस निरिक्षक जुन्नर पोलीस स्टेशन, अनिल लोहकरे गोपनीय कक्ष अधिकारी, कुलदिप कोकाटे पोलीस पाटील, नंदिनी सुकाळे मॅडम, विजय पोटे, प्रतिक खरात, डॉ.संदिप डोळस, अनंत सोनवणे, दिपक सोनवणे, संदिप उघडे, इंदुबाई सोनवणे, रेखा मोहिते मुख्याध्यापिका जि.प.प्रा.शाळा बोतार्डे व रघतवान पशुवैद्यकीय दवाखाना कर्माचारी व ग्रामस्थ व महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाला बहुसंख्येने प्रमुख पाहुणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमासाठी सहकार्य जनसेवा आदिवासी मंडळाचे कार्यकर्ते बिरसा ब्रिगेड अध्यक्ष नितिन कोकाटे, बौध्द विकास मंडळ बोतार्डे व महिला तरूण मंडळाने केले.



या कार्यक्रमाचे निवेदन सुनिल खरात व आभार बाळू खरात यांनी केले.



यानंतर दुपारी २ वाजता स्नेहभोजन झाले व कार्यक्रम संपन्न झाला.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: साप्ताहिक उद्याचा शिलेदार प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा...
साप्ताहिक उद्याचा शिलेदार प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjY2fKBKkzEkYaiqS4532DjeN40T3hhypOEgpmnrbjBrwVTXaHcCYHFTygBGEpACFGabWo3JXTIS64gtc0LX2aKlIR-XIEyBJA501J2_DPWYJ_3sfoJpsmFM8y_wCiO-seh0S7Ib9_-qeIm5h3Vz2VgyZpXRSNrHkFQL92Fz6fkVhqpYsI-GMB7Cb_g4y4/s320/IMG-20231205-WA0165.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjY2fKBKkzEkYaiqS4532DjeN40T3hhypOEgpmnrbjBrwVTXaHcCYHFTygBGEpACFGabWo3JXTIS64gtc0LX2aKlIR-XIEyBJA501J2_DPWYJ_3sfoJpsmFM8y_wCiO-seh0S7Ib9_-qeIm5h3Vz2VgyZpXRSNrHkFQL92Fz6fkVhqpYsI-GMB7Cb_g4y4/s72-c/IMG-20231205-WA0165.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2023/12/blog-post_6.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2023/12/blog-post_6.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content