प्रतिनिधी : अमिन शेख ( सर ) शेगाव तालुका वानखेड :- आज दुर्गादैत्य येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट देऊन श्री स्वप्नील देशमुख यांनी ...
प्रतिनिधी : अमिन शेख ( सर )
शेगाव तालुका
वानखेड :- आज दुर्गादैत्य येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट देऊन श्री स्वप्नील देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थासोबत संवाद साधल्याने आपल्या शालेय जीवनातील आठवनींना सुद्धा उजाळा दिला.
मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण शाळेतील जास्त असणे मुलींचा असलेला सहभाग यातील शिक्षकांचे योगदान याबाबत सर्व, माहिती चर्चा करून जाणुन घेतली. शालेय पोषण आहार, त्याचा दर्जा, मुलांची बसण्याची व्यवस्था, स्वछता, पाण्याची व्यवस्था किचन शेड, वर्गखोल्या,शाळेच्या बोलक्या भिंती या सर्व बाबी बघुन समाधान व्यक्त केले.
तसेच विद्यार्थ्यांना गणित आणि भाषेतील कौशल्ये शिकविण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. गणिताची भीती बाळगू नका ,तर त्याला खेळाप्रमाणे घ्या . शैक्षणिक वातावरण वाढविले पाहीजे कारण आपण सर्वजण आपल्याला जे माहीत नाही ते शिकण्यासाठी शाळेत जातो त्यांनी चुका केल्या तर विद्यार्थ्यांना समजावून सांगत विषय सोपा करा आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी गणित महत्त्वाचे असते एकमेकांना मदत करून पुढे जा.चांगल्या बाबीचा नेहमी सराव करा चांगले जीवन जगण्यासाठी चांगले माणूस बनण्यासाठी जीवनात प्रत्येक क्षणी गणितात आणि गणित महत्वाचे आहे. असे सांगितले.
शालेय परिसर व स्वछता, पाहून समाधान व्यक्त केले.
COMMENTS