बोतार्डे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे येथील बिरसा भवन येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्य...
बोतार्डे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे येथील बिरसा भवन येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी सतिश शिंदे ( पत्रकार ), बाळू खरात, मनोहर कोकाटे ( माजी सैनिक ) यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुभाष मरभळ, विजय पोटे, चैतन्य घोडे, मुकेश मरभळ, विठ्ठल कोकाटे, रोहिदास मरभळ, संदिप डोळस तसेच तरूण मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन कोकाटे यांनी केले.
COMMENTS