पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी ( रजि ) पुणे जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारीणी काल गुरूवार ३१ ऑगस्ट २...
पुणे- डॉ.
बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी ( रजि ) पुणे जिल्ह्याची
नवनिर्वाचित कार्यकारीणी काल गुरूवार ३१ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिर झाली. राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी डि. बी. ए. अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक
विचारमंच रत्नागिरी ( रजि ) या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर
मौलिक कार्य केले जात आहे.
बुध्द,
शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या क्रांतिकारी विचारांची जोपासना करणाऱ्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत ( रजि ) या संस्थेच्या
वतीने पुणे जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.
डि. बी.
ए. अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य रत्नागिरी भारत
( रजि ) पुणे जिल्हा अध्यक्षपदी सन्माननीया वैशाली लांडगे, उपाध्यक्षपदी सन्माननीय
संतोष मोहिते, सचिवपदी सन्माननीय प्रा. सतिश शिंदे, सहसचिवपदी सन्माननीया प्रतिभा
किर्तीकर्वे, कार्याध्यक्षपदी सन्माननीय जयद्रथ आखाडे, कोषाध्यक्षपदी सन्मानीय वैभव
धर्माधिकारी तर प्रसिध्दी प्रमुख व ग्राफिक्सकार सन्माननीया नंदिनी सुकाळे यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
हि नियुक्ती
सन्माननीय संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव सर, सहसंस्थापिका व संपादिका भावना खोब्रागडे
व सन्माननीय अशोक पवार पुणे विभागीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली,
यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शुभेच्छा देत अभिनंदन केले.
COMMENTS