३३ कवीनी दिली लोकशाहिर अणाभाऊ साठे यांना काव्यरूपी मानवंदना!! ✍️📕✍️📗✍️📘✍️📙✍️ ÷÷÷÷÷¶¶¶¶¶¶¶¶÷÷÷÷÷÷÷÷ ज्यानी आपल्या प्रगल्भ लेख...
३३ कवीनी दिली लोकशाहिर अणाभाऊ साठे यांना काव्यरूपी
मानवंदना!!
✍️📕✍️📗✍️📘✍️📙✍️
÷÷÷÷÷¶¶¶¶¶¶¶¶÷÷÷÷÷÷÷÷
ज्यानी आपल्या प्रगल्भ लेखणीच्या माध्यमातून सर्व जगावर अधिराज्य निर्माण केले. ते लोकशाहिर अर्थातच लेखणीचा बादशहा अण्णाभाऊ साठे
यांच्या १०३ व्या जयंती दिनानिमित्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.) व पुणे जिल्हा कमिटि यांच्या संयुक्तपणे आयोजित केले होते.
३७ वे ऑनलाईन राज्यस्तरीय कविसंमेलन पुणे येथील जेष्ठ कवी मा.जयद्रथ आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी प्रथम कविसंमेलनाची सुरूवात चिपळूण येथील जेष्ठ कवी मा.राहुल जाधव यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे याच्या माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या कायली... या गीताने कविसंमेलनाची सुरुवात केली.
त्यानंतर पुणे जिल्हाध्यक्षा कवयित्री
*वैशाली लांडगे* यांनी प्रस्तावना केली व कविसंमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर नागपूर विभागीय अध्यक्ष मा सोपानदेव मशाखेत्री, पुणे विभागीय अध्यक्ष मा.अशोक पवार, सहसंस्थापिका व संपादिका मा.भावना खोब्रागडे व संस्थापक -अध्यक्ष मनोज जाधव सर यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला...
तर कविसंमेलनाच्या अध्यक्षणिय भाषणात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक क्षेत्रातील प्रवास हा थक्क करणारा असून खर्या अर्थाने अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर गाजविले आहे. हे समजावून सांगितले, सर्व कविना शुभेच्छा देत लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर D.B.A. प्रकाशनच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहा मध्ये जास्तीत जास्त कवीनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. त्यानंतर रितसर कवी संमेलनाला सुरूवात झाली. या कविसंमेलना मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अक्षरशः काव्यरुपी बरसात झाली... एकापेक्षा एक आणि सरास कविता सादरीकरण झाल्या. या कविसंमेलना मध्ये ३३ कवीनी सहभाग घेऊन कविसंमेलन यशस्वी केले. सदर कविसंमेलनाचे सुत्र संचालन पुणे येथील कवयित्री मा.प्रतिभा किर्तीकर्वे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.सतिश शिंदे सर यांनी अतिशय बहारदार पध्दतीने केले .
या ऑनलाईन कविसंमेलना मध्ये सहभागी झालेल्या सर्व कवीचे डि.बी.ए.परिवार तर्फे हार्दिक ! हार्दिक ! अभिनंदन !!! व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा !!
*आयोजक*
D.B.A.पुणे जिल्हा कमिटि
व
*मा.अशोक पवार*
पुणे विभागीय अध्यक्ष
*मा.भावना खोब्रागडे*
सहसंस्थापिका व संपादिका
*मा.मनोज जाधव सर*
संस्थापक - अध्यक्ष
🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳🇺🇳
COMMENTS