बोतार्डे: प्रतिनिधी जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेलसर पासून ते भिवाडे या दरम्यानच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून सध...
बोतार्डे: प्रतिनिधी
जुन्नर तालुक्याच्या
पश्चिम भागातील बेलसर पासून ते भिवाडे या दरम्यानच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे
पडले असून सध्या पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल व घाण
पाणी साठले जात आहे. सबंधित गोष्टीकडे सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
होत आहे.
या भागातील बोतार्डे
येथील दत्तमंदिर, आमलेवाडी, ढाकोबावाडी व राळेगण तसेच शिंदे व वरील भागापर्यंत सार्वजनिक
बांधकाम विभागाच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात बाभळी व इतरही
झाडे वाढली आहेत यामुळे वास्तविक दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी अडचण येत आहे, या रस्त्याची मागे
उन्हाळ्यात डागडुजी केली होती, मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे, या रस्त्यावरील खड्ड्यांतून वाहनचालकांना मार्ग
काढताना मोठी कसरत करूनच जावे लागत आहे.
खरं तर या अवस्थेमुळे
दुचाकीस्वार या चिखलाच्या रस्त्यावरून जाताना घसरून देखील पडले आहेत, यामुळे मोठा
अपघात होऊ शकतो याकडे सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग यांनी त्वरीत लक्ष देऊन या रस्त्याची
पाहणी करावी व खड्डे व रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडावीत जेणेकरून वाहनचालकांना
वाहने चालविताना त्रास होणार नाही, अशा प्रकारची
मागणी वाहनचालक व या भागातील नागरीक करत आहेत.
COMMENTS