प्रतिनिधी : नवनाथ मोरे जुन्नर : जुन्नर तालुक्यातील धोलवड या गावातील युवक कै.प्रकाश बबन नलावडे (वय 38 )यांच्या दशक्रियाच्या निमित्ताने आज (...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील धोलवड या गावातील युवक कै.प्रकाश बबन नलावडे (वय 38 )यांच्या दशक्रियाच्या निमित्ताने आज (दि.11) हृदयरोग जनजागृती मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते.
दहा दिवसांपूर्वी नलावडे परिवारातील युवक प्रकाश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आणि नलावडे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला. यातून सावरत समाजाला प्रबोधन करण्यासाठी जे दुःख आपल्या वाट्याला आलेले आहे हे इतर कोणत्याही कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी (हार्ट अटॅक) हृदयरोग विषयावरती जनजागृती करण्याचे त्यांनी ठरवले.
नारायणगाव येथील विघ्नहर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष बोळीज व डॉ. दयानंद गायकवाड यांनी उपस्थितांना हृदयरोग म्हणजे काय, त्याची लक्षणे, त्यावरील उपाययोजना व आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे याविषयीं मार्गदर्शन केले. दशक्रिया विधीनंतर या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. आरोग्यवर्धक उपयुक्त माहिती पहिल्यांदाच ग्रामीण भागातील महिलांना ऐकावयास मिळाल्यामुळे त्यांना फार समाधान लाभले, व समाजात जनजागृती झाली.
COMMENTS