सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) जुन्नर - ओतूर रस्त्यावरील वेशीजवळ पेशवेकालीन जुन्नर चे भेदिक लावणी शाहीर गोविंदराव भागवत यांच्या समाधी ...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
जुन्नर - ओतूर रस्त्यावरील वेशीजवळ पेशवेकालीन जुन्नर चे भेदिक लावणी शाहीर गोविंदराव भागवत यांच्या समाधी मंदिरात त्यांच्या नावाने "पदचिन्ह " सन १८१८ मध्ये स्थापन करण्यात आले होते. मात्र काही वर्षापूर्वी जोरदार पावसामुळे हे समाधी मंदिर जमीनदोस्त झाले. त्यातील त्यांचे " पदचिन्ह" समाधी मंदिराच्या परिसरात दुर्लक्षित ठिकाणी दुरवस्था स्वरूपात राहिल्याची खंत जुन्नरचे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे, यांनी व्यक्त केली.
ताम्हाणे म्हणाले की, गोविंदराव हे जुन्नरच्या साळी घराण्यातील आडनाव भागवत त्याचा बाप गणोजी नावाचा होता. तो सत्व पुरुष मानला जाई. गणोजीला भिवाजी नावाचा पुत्र होता . तोही बापासारखाच मान्य पुरुष होता. गुणोजीचा दुसरा पुत्र जो होता तो गोविंदराव भागवत हा फार मोठा भेदिक लावणीकार तसेच भागवतभक्त संत कवी म्हणून पेशवे काळात प्रसिद्ध होता. तो शेले विणता विणतांच भेदिक लावण्याची कवणे रचीत असत.
संतांनी समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत वेदांत पोचविण्याचे काम केले. हेच कार्य शाहीर गोंविदराव यांनी आपल्या लावणीच्या माध्यमातून केले. पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मंदिरात त्यांना भेदिक लावणीचा कार्यक्रम करण्याचा मान मिळाला होता. जुन्नर परिसरावर त्यानी लावण्या रंचलेल्या होत्या. त्या लावण्या आजही जुने जाणते शाहीर मंडळी गाताना दिसतात.
जुन्नर प्रांतात गोविंदराव भागवत चा अस्कार होता. सध्याच्या काळात भेदिक लावणी शाहिराच्या फडात ज्या नमनाच्या किंवा मुजऱ्याच्या लावण्या आहेत . त्यात आजही गोविंदरावाच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. कलगी - तुरा लावणी शाहीरी मंडळात गोविंदराव भागवत यांच्या भेदिक लावणी ला केवढा मान दिला जात आहे ते कलगी - तुऱ्यातील लग्नाच्या रूपकात्मक लावणी वरुन स्पष्ट होते. पेशवे कालीन भेदिक लावणी फडात गोविंदरावाला अग्रक्रम दिला आहे.
गोविंदराव भागवत यांनी स्वतः रचलेल्या भेदिक लावण्या गाणारी वयस्कर व्यक्ती आजही सांगतात की, कोणाच्या घरात काही बांधा किंवा पिशाच्च पीडा होऊ लागला तर त्या घरात गोविंदरावी लावण्याचा कार्यक्रम करावा. म्हणजे ती पीडा नाहीशी होते अशी अद्यापही जुन्नर परिसरातील लोक समजूत आहे.
गोविंदराव करी शाहिरी !
शहर जुन्नरी गड शिवाबाई शिवनेरी !
तो गोविंदराव साळी गातो छंद !
तो विंणता विणता सहज करी कटिबंध !
गोविंदराव साळी जुन्नर चा कवी तो भारी !
रोज येकूणता उतारी !
बोलणे शास्त्र आधारी !
अशी गोविंदराव भागवत शाहीराची महती तत्कालीन भेदिक लावणी फडातील मंडळी गात असतात . पेशवे कालीन भेदिक लावणी शाहीराच्या समाधी मंदिरातील
" पदचिन्ह " दुर्लक्षित ठिकाणी दूरवस्था स्वरूपात आहे. तेथील परिसरात गवत काटेरी झुडुपे वाढलेली असल्याने त्या पदचिन्हाचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. असे बापूजी ताम्हाणे, यांनी सांगितले.
COMMENTS