क्राईमनामा Live : दिनांक 16 मे 2023 रोजी जागतिक डेंग्यू दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, जिल्हा हिवताप अधिकार...
क्राईमनामा Live : दिनांक 16 मे 2023 रोजी जागतिक डेंग्यू दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे तालुकास्तरीय जागतिक डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीहरी सारोक्ते, ओतूर ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच प्रशांत डुंबरे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वनघरे, यांच्या समन्वयातून जागतिक डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ वाघिरे,आरोग्य पर्यवेक्षक दिलीप कचेरे व तालुका प्रतिनिधी जयराम रावते यांनी उपस्थित आरोग्य सेवक व आशा कार्यकर्ती यांना डेंग्यू दिनाबाबत व डास प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन केले. तसेच ओतूर शहरामध्ये माहिती पत्रक वाटून, कंटेनर सर्वेक्षण करून, जनजागृती फेरी काढण्यात आली.
डेंग्यू जनजागरण व सर्वेक्षणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर, मढ, आपटाळे व इंगळून येथील सर्व आरोग्य सेवकांनी व ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व आशा कार्यकर्ती यांनी सहभाग नोंदविला.
याकामी प्रा.आ.केंद्र ओतूर आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भाग्यश्री मोरे, आरोग्य सहाय्यक मच्छिंद्र शेलार, कैलास बोऱ्हाडे, आरोग्य सेवक सुनील यादव. आरोग्य सहाय्यीका मंजुळा गाडगे, सविता पगार, गटप्रवर्तक स्नेहल चव्हाण, संजीवनी गायकवाड यांनी नियोजन केले.
COMMENTS