शिव पाणंद शेतरस्त्यांसह पाझर तलावांच्या दुरुस्त्यांसाठी शेतरस्ते पिडीत शेतकर्यांचे पारनेर तहसिलदारांना निवेदन ... क्राईमनामा Live : प...
शिव पाणंद
शेतरस्त्यांसह पाझर तलावांच्या दुरुस्त्यांसाठी शेतरस्ते पिडीत शेतकर्यांचे
पारनेर तहसिलदारांना निवेदन...
क्राईमनामा Live
:
पारनेर तालुका जेष्ठ
समाजसेवक अण्णासाहेब हजारे,
स्वातंत्र्यवीर सेनापती
बापटांचा तालुका असुन या तालुक्याने अनेक मोठमोठ्या समाजहिताच्या चळवळींनी तालुक्याला दिशा दिलेल्या
आहेत. मात्र याच पारनेर तालुक्यात सुरु झालेली शिवपाणंद शेतरस्त्यांची चळवळ
राज्यभर पोहचली व या चळवळीची प्रेरणा घेत महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या
प्रमाणावर शिव पाणंद शेतरस्त्यांची कामे होताना दिसत आहे.
मात्र असे असताना,
अहमदनगर जिल्हयात आंदोलनाला गांभिर्याने घेत जिल्हाधिका-यांनी सप्तपदी अभियानातुन
शिवपाणंद रस्ते खुले करण्यासाठी अवाहन केले होते.
पारनेर तालुक्यातून सर्वाधिक शेतरस्त्यांचे अर्ज पारनेर तहसिल कार्यालयाला
देण्यात आले मात्र या संदर्भात तहसिल प्रशासनाकडून या अर्जांना केराची टोपली
दाखावण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी कंटाळून
अखेर पुन्हा एकदा पारनेर तालुक्यातील
गावोगावचे शिवपाणंद शेतरस्ते,
पाझर तलावांसह पुरातन जलस्त्रोतांच्या दुरुस्तीसाठी व
शेतकऱ्यांना सप्तपदीचे फसवे आमिष दाखवणारे अधिकारी यांच्यावर दि.२४/०४/२०२३ पर्यंत
कार्यवाही करावी, अन्यथा पुन्हा नव्याने उभ्या झालेल्या शिवपाणंद शेतरस्ते, पुरातन जलस्रोत पुनर्जिवन चळवळीच्या माध्यमातुन पारनेर
तालुक्यातील शेतकरी पारनेर तहसिल कार्यालयात पेरु वाटप आंदोलन करणार असल्याचे
सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांसह शेतरस्ते पिडीत शेतकरी भाऊसाहेब वाळुंज, रामदास खोमणे,
दशरथ वाळुंज, बाळासाहेब औटी,
संतोष लोणकर, हौशीरान कुदळे यांसह शेतकर्यांनी नायब तहसिलदार गणेश आढारी यांच्यासह पारनेर
पोलिस स्टेशनला निवेदन दिले.
- उभ्या जगाचा पोशिंदा
आज जीवन मरणाची लढाई करत असून शेती करणे ही एक प्रकारची शिक्षा आज बळीराजा भोगत
असुन एकीकडे निसर्गाचा ढासळलेला समतोल शेतकऱ्याच्या जिवावर उठला असुन दुसरीकडे
शेतीसाठी रस्ते, पाणी, वीज यासाठी पिढ्यान पिढ्या संघर्ष करत असुन
शासनाच्या योजना फक्त कागदावरच दिसत असुन प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही
त्याचा आक्रोश ऐकण्यासाठी अन्नदात्याने मोठ्या कष्टाने पिकवलेल्या अन्नाला खाताना तरी आठवण यायला हवी
खोटे भावनिक समर्थन देण्यापेक्षा बळीराजाच्या पाठीशी राहणाराच आजच्या काळात वंदनीय
ठरेल.-शरद पवळे संस्थापक अध्यक्ष आधार फांऊडेशन
COMMENTS