जुन्नर - २५ एप्रिल जागतिक हिवताप दिनाच्या औचित्य साधून जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभाग व पंचायत समिती आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जु...
जुन्नर - २५ एप्रिल जागतिक हिवताप दिनाच्या औचित्य साधून जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभाग व पंचायत समिती आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्साहात प्रत्येक हिवताप दिन साजरा करण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताताप दिन साजरा करण्यात आला.
यावेळी नारायणगाव येथील प्रशासक किसन मोरे, ग्रामसेवक नितीन नाईकडे व वारूळवाडी गावचे सरपंच राजेंद्र मेहेर व ग्रामसेवक सचिन उंडे यांचे तर्फे नारायणगाव व वारूळवाडी येथे हिवताप, डेंगू, चिकून गुनिया, हत्तीरोग, झिका इत्यादी आजार होऊ नये म्हणून गावात माहिती देऊन व पॉम्पलेट वाटून लोकांचे जनजागरण केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ.चैताली कांगुणे, जिल्हा हिवताप कार्यालयाचे प्रतिनिधी मारुती पाटोळे, शौकत इनामदार तालुका आरोग्य पर्यवेक्षक दिलीप कचेरे, राजेश आरकिले, सोपान घोगरे, तालुक्यातील प्रा.आ.केंद्र मढ, आपटाळे, इंगळून येथील आरोग्य सेवक, प्रा.आ. केंद्र वारूळवाडी येथील गट प्रवर्तक वर्धा वारुळे व आशा कार्यकर्ती हजर होत्या.
उपस्थित कर्मचारी व नागरिकांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, जिल्हा हिवताप पुणे येथील मारुती पाटोळे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक दिलीप कचेरे यांनी जागतिक हिवताप दिना निमित्ताने मनोगत व्यक्त केले. उपस्थित आरोग्य सेवक व वारूळवाडी येथील आशा कर्तकरती व प्राथमिक आरोग्य केंद्र वारूळवाडी येथील सर्व स्टाफची प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथून रॅली काढण्यात आली.
आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी घरोघर जाऊन कंटेनर सर्वेक्षण करून नागरिकांना हिवताप, डेंग्यू, चिकुन गुनिया, झिका या आजारांची लक्षणे व प्रतिबंधक उपायोजना यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चैताली कांगुणे यांनी तर सूत्रसंचालन श्री.नरेंद्र देठे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.वैभव सहाने यांनी मानले.
COMMENTS