जुन्नर- शनिवार दि. २९ एप्रिल २३ रोजी जिल्हा परिषद पुणे आयोजित उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्कृष्ट आशा स्वयंसेविका व कायकल्प बक्षीस का...
जुन्नर- शनिवार दि. २९ एप्रिल २३ रोजी जिल्हा परिषद पुणे आयोजित उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्कृष्ट आशा स्वयंसेविका व कायकल्प बक्षीस कार्यक्रमात,ज्या आरोग्य केंद्राने उत्कृष्ट काम केले आहे त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे हस्ते व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.रामचंद्र हंकारे,पुणे मनपा चे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांचे उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी जुन्नर तालुक्यातील सावरगाव आरोग्य केंद्राला तालुकास्तरीय प्रथम मानांकन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथील गट प्रवर्तक पूनम शिंदे - मनसुख यांना व सावरगाव आरोग्य केंद्राच्या अंतर्गत अमरापूर उपकेंद्रातील आशा कार्यकर्ती रुपाली मंडलिक यांचा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक आल्याने उपस्थित मान्यवारांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. याही वेळी जुन्नर तालुक्यातून प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव सर्व इंडिकेटर्स मध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांनी सांगितले तर तालुकास्तरावरून प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव ला मिळालेला हा बहुमान सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे फलित असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ.जाहीद जाफरी यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.जाहिद जाफरी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, दिलीप कचेरे, आरोग्य सहाय्यक विजय दिवटे, आरोग्य सहायिका सुनंदा पाचपुते, आरोग्य सेविका ज्योती कोळसे, गटप्रवर्तक पुनम शिंदे इत्यादी हजर होते.
COMMENTS