जुन्नर- गुरूवर्य कोंडाजीबाबा डेरे वारकरी शिक्षण संस्था, वैष्णवधाम, तालुका जुन्नर जि. पुणे येथे शैक्षणिक व आध्यात्मिक विकास शिबिरामध्ये ५५ न...
जुन्नर- गुरूवर्य कोंडाजीबाबा डेरे वारकरी शिक्षण संस्था, वैष्णवधाम, तालुका जुन्नर जि. पुणे येथे शैक्षणिक व आध्यात्मिक विकास शिबिरामध्ये ५५ निवासी विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक गुरु यांचे उपस्थितीमध्ये मन करा रे प्रसन्न या विषयावर दिलीप कचेरे यांचे व्याख्यान झाले.
या व्याख्यानप्रसंगी लहान बाल गोपाल रमून गेले होते. त्यांचं मन प्रसन्न करण्यासाठी व त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा कचेरे यांनी अतिशय चांगला प्रयत्न केला. या व्याख्यानास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. वैष्णवधाम गावचे सरपंच यांच्या हस्ते कचेरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुलांनी मनापासून स्वतःच्या हस्ते बनवलेला पुष्पगुच्छ देऊन दिलीप कचेरे यांचा सन्मान केला त्याबद्दल सरपंच, ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी आणि गुरु,शिक्षक यांचे दिलीप कचेरे यांनी आभार मानले.
COMMENTS