मुंबई : मुंबईमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. लालबागमधील पेरू कम्पाऊंड परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडला आहे ...
मुंबई : मुंबईमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. लालबागमधील पेरू कम्पाऊंड परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडला आहे तर एका निर्माणाधीन इमारतीतून 19 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.
याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाचौकी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत महिलेचे वय 50 ते 55 वर्षांच्या दरम्यान आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिस मृत महिलेच्या मुलीची चौकशी करत आहेत. मुलीनेच खून करून मृतदेह पॅक करून कपाटात लपवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी २२ वर्षीय मुलीला ताब्यात घेण्यात आले असून तिची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
लालबाग परिसरातच एका 19 वर्षांच्या युवकाचा बाराव्या मजल्यावर हा मृतदेह सापडला आहे. मसूदमिया रमझान असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या हत्येपूर्वी हातपाय बांधले होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही इमारत 45 मजल्यांची आहे. मुळचा पश्चिम बंगालचा असलेला युवक याच इमारतीत काम करत होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे.
COMMENTS