सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत सामाजिक उपक्रमाअंतर्गत दरवर्षी सामुद...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : श्री
लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत सामाजिक उपक्रमाअंतर्गत दरवर्षी
सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे
समाजातील गरीब गरजूंना आपल्या मुलामुलींचे विवाह थाटामाटा करता येतात. हे विवाह
सोहळे समाजासाठी प्रेरणादायी असून सर्वसामान्यांना उपयुक्त आहे. याही वर्षी
देवस्थानच्या वतीने रविवार दिनांक १४ मे रोजी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे
आयोजन करण्यात आले आहे.या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात प्रथम नोंद होणाऱ्या १५
वधू-वरांचा मोफत विवाह होणार असून देवस्थानच्या वतीने लग्नकार्यकरिता आवश्यक सर्व
सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. सदर विवाहाची नाव नोंदणी देवस्थानचे कार्यालयात
चालू आहे तसेच स्वतंत्र विवाहांकरीता देवस्थानचे हॉल अल्पदरात दिले जातात अशी
माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.
COMMENTS