लातूरः मुलीच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीला भीषण अपघात झाला असून, यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आ...
लातूरः मुलीच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीला भीषण अपघात झाला असून, यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
निलंगा ते औराद महामार्गावर कारला आज (शुक्रवार) अपघात झाला आहे. चाकूर तालुक्यातील एक कुटुंब इनोव्हा मोटारीमधून औराद शहाजनीकडे मुलीच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी जात होते. मात्र, यावेळी वाटेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार चार वेळा पलटी होऊन शेतात जाऊन पडली. यावेळी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तात्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झालेत आहेत. तर एका सहा वर्षाच्या मुलासह आणखी एक जण गंभीर जखमी आहे. दोन्ही जखमींवर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. भगवान मारोती सावळे, विजयमाला भाऊराव सावळे, लता भगवान सावळे, राजकुमार सुधाकर सावळे अशी मृतांची नावे आहेत.
COMMENTS