आरोग्य टिप्स : अनेकांना तोंड येण्याची समस्या असते. उन्हाळ्यात तर ती अधिक वाढते. खरंतर शरीरातील उष्णता वाढल्याने तोंडात फोड येणे, जखमा होणे अ...
आरोग्य टिप्स : अनेकांना तोंड येण्याची समस्या असते. उन्हाळ्यात तर ती अधिक वाढते. खरंतर शरीरातील उष्णता वाढल्याने तोंडात फोड येणे, जखमा होणे असे प्रकार उद्भवतात.
मात्र, त्यामुळे तोंड येणाऱ्या व्यक्तीच्या जेवणावर परिणाम होतोच. शिवाय वेदनांमुळे तो व्यक्ती पूरता त्रस्त होतो. मात्र, यावर 3 अत्यंत प्रभावी असे घरगुती उपाय असून ते स्वस्त देखील आहेत. (3 Tips For Mouth Ulcer Remedies)
मधामुळे मिळेल आराम-
तोंड आल्यानंतर ते कमी करण्यासाठी तसेच दूर करण्यासाठीही तुम्ही मधाचा वापर करू शकतात. मध हे अनेक नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असते. तोंड घालविण्यासाठी एका बोटावर मध घेऊन ते तोंड आलेल्या ठिकाणी फोडांवर लावल्यास त्याचा फायदा होईल. मध लावल्यावर तोंडात तयार झालेली लाळ थुंकून न देता ती गिळून घ्यावे. दिवसांतून तीन ते चार वेळा तरी अशा प्रकारे मध लावावे. त्यामुळे तुम्हाला आरा मिळेल.
हळद प्रभावी उपाय-
आयुर्वेदात हळद एक औषध म्हणून महत्त्व दिले जाते. तोंड येत असल्यास हळद लावल्यास त्याचा फायदा होतो. तोंड आले असल्यास हळद पावडर घेऊन त्यात थोडं पाणी टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट तोंड आलेल्या ठिकाणी लावा. किमान आठवडाभर रोज ही पेस्ट लावल्यास तोंड दूर होण्यास मदत होईल. या पेस्टमुळे तुम्हाला तोंडाच्या संसर्गापासून आराम मिळेल.
मीठाच्या पाण्याच्या गुळण्या-
मिठात जंतुनाशक गुणधर्म असतात, ज्याच्या वापराने तोंड आल्यानंतर त्यामुळे होणारे व्रण बरे होण्यास मदत होते. तोंडात फोड आले असल्यास तुम्ही मिठाचे पाणीही वापरू शकता. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळून त्याने चिळ भरावी, यामुळे तोंडात झालेला संसर्ग कमी होण्यास मदत होईल.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)
COMMENTS