सा तारा : सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. संबंधित मुलीवर नववीत श...
सातारा : सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. संबंधित मुलीवर नववीत शिकणाऱया विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला होता.
मासिक पाळी नियमित न आल्याने तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पीडित मुलीने झालेला प्रकार त्यावेळी कोणालाच सांगितला नव्हता. मुलीच्या मासिक पाळीवरुन तिची तपासणी सुरू असताना डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरुन तिची सोनोग्राफी करण्यात आली आणि हा सर्व प्रकार समोर आला. याबाबत पीडित मुलीच्या आईने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबधित शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला रिमांडहोममध्ये दाखल केले आहे. या घटनेतील संबधित मुलीला सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत असून, इन्स्टाग्रामवर या दोघांची मैत्री जमली होती. यानंतर हा प्रकार घडला आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी मुलीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी केल्यानंतर पीडिता चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्याने पीडिताच्या कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS