हैदराबाद : प्रेयसीला तिच्या पूर्वीच्या प्रियकराने फोन केला म्हणून आरोपीने आपल्याच मित्राची हत्या करून, मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला अन् फ...
हैदराबाद : प्रेयसीला तिच्या पूर्वीच्या प्रियकराने फोन केला म्हणून आरोपीने आपल्याच मित्राची हत्या करून, मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापला अन् फोटो प्रेयसीला पाठवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
त्यानंतर आरोपी स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रेयसीला तिच्या पूर्वीच्या प्रियकराने फोन केला म्हणून आरोपीने आपल्याच मित्राची हत्या केली. हत्येनंतर आरोपी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याने अत्यंत क्रूर अशा पद्धतीने आपल्या मित्राची हत्या केली. हत्येनंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला, नंतर त्याची बोटं देखील कापली. आरोपीने हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित नवीन आणि हरिहर कृष्णा हे हैदराबादमधील दिलसुखनगर येथील एका महाविद्यालयात सोबत शिकत होते. नवीन याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी ही मुलगी हरिहर कृष्णासोबत राहू लागली. मात्र नवीन हा त्या मुलीला मेसेज करत होता. याच रागातून आरोपी हरिहर कृष्णा याने नवीनच्या हत्येचा कट रचला.
हरिहर कृष्णा याने नवीनच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला होता. त्यानंतर त्याने 17 फेब्रुवारी रोजी नवीन याला एका पार्टीसाठी निमंत्रण दिले होते. नवीन या पार्टीला गेला. दारूच्या नशेत दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. हरिहर कृष्णा याने नवीनचा गळा दाबून तिथेच हत्या केली. त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह एका मोकळ्या मैदानात टाकला. आरोपीने त्याच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले. त्याचा प्रायव्हेट पार्ट आणि हृदय शरीराच्या वेगळे करून त्याने आपल्या प्रेयसीला त्याचा फोटो पाठवला. पण, हरिहर कृष्णा आपल्यासोबत मजाक करत आहे, असे त्याच्या प्रेयसीला सुरुवातीला वाटले. मात्र, त्यानंतर आरोपी स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS