क्राईमनामा Live : संत निरंकारी मिशनद्वारा अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियानाचा भव्य शुभारंभ..! | CrimeNama
Loading ...

क्राईमनामा Live : संत निरंकारी मिशनद्वारा अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियानाचा भव्य शुभारंभ..!

सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील कुकडी नदी वरील भास्कर घाट येथे निरंकारी स्वयंसेवकांनी केला स्वच्छ २...



सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )

क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील कुकडी नदी वरील भास्कर घाट येथे निरंकारी स्वयंसेवकांनी केला स्वच्छ

२६ फेब्रुवारी, २०२३ : संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निरंकारी सदगुरु माता सुदिक्षा जी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत 'स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान सकाळी ७ ते १२ या वेळेत संपन्न झाले. या अभियानामध्ये आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील घोड नदी सह मीना, कुकडी नदीचा घाट क्षेत्रातील पाण्यात पडलेला प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा, अपशिष्ट (निरुपयोगी) पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ, जलपर्णी तसेच जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ जाळीयुक्त काठ्यांचा वापर करुन स्वच्छ करण्यात आले तसेच नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला.   


         

संत निरंकारी मिशनचे पुणे झोनल प्रभारी श्री.ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ही परियोजना संपूर्ण भारतदेशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास ११०० हुन अधिक ठिकाणी राबविण्यात आली.‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना, कुकडी, मीना, वेळू अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण ५००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. ‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश होता.          

बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले, त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरुवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात आले आहे.        

या परियोजने अंतर्गत आज २६ फेब्रुवारी २०२३ रोजी, एकाच दिवशी संपूर्ण भारतभर निरंकारी मिशनच्या सुमारे १.५ लाखहुन अधिक स्वयंसेवकानी समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीर, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता केली तसेच जल संरक्षणाची प्रेरणा दिली.        

या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी पथनाट्यांद्वारे पाण्याचे महत्व आणि संरक्षणाच्या प्रति लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली, तसेच पाण्यातून होणाऱ्या रोगांच्या बाबतीत माहिती देण्यात आली. ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयत्न आहे असे उपस्थित लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. जितेंद्र बिडवई यांनी शुभारंभ प्रसंगी सांगितले.

COMMENTS

Name

Agriculture,57,Ahmednagar,51,Amaravati,10,Aurangabad,29,Breakin,1,Breaking,2280,Buldhana,11,Chandrapur,1,Cooking,2,Crime,577,Dhule,7,Entertainment,42,Gadchiroli,5,Health,411,India,225,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,9,Lifestyle,192,Maharashtra,829,Mumbai,193,Nagpur,18,Nashik,27,Politics,229,Pune,1373,Raigad,14,Ratnagiri,13,Sangali,14,Satara,21,Sindhudurg,3,Solapur,11,Sport,55,Technology,23,World,54,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: क्राईमनामा Live : संत निरंकारी मिशनद्वारा अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियानाचा भव्य शुभारंभ..!
क्राईमनामा Live : संत निरंकारी मिशनद्वारा अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियानाचा भव्य शुभारंभ..!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjOW9DHe_teqbN3hquk7M2dJ5vbth0LlRKOKD1vPXisZjpGG0uHGnf5YpsUcXYy-5N69ckcpTVckbASb0Q5B5EBlJLrQ31gyYTMxAjJsB5QKnxColK5QCyHXXn-rwCjd7fpEBDJKIZeLe6Yq1FRnjBBd6t9DMxghFkDUbqto1YJs5m9yRtCvVCQ7vrL/s320/IMG-20230226-WA0079.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjOW9DHe_teqbN3hquk7M2dJ5vbth0LlRKOKD1vPXisZjpGG0uHGnf5YpsUcXYy-5N69ckcpTVckbASb0Q5B5EBlJLrQ31gyYTMxAjJsB5QKnxColK5QCyHXXn-rwCjd7fpEBDJKIZeLe6Yq1FRnjBBd6t9DMxghFkDUbqto1YJs5m9yRtCvVCQ7vrL/s72-c/IMG-20230226-WA0079.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2023/02/live_26.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2023/02/live_26.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content