बीड : पुणे-नगर महामार्गावर शिरूर तालुक्यातील कारेगावजवळ झालेल्या अपघातात भोंडवे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील चौघांवर एकाच...
बीड : पुणे-नगर महामार्गावर शिरूर तालुक्यातील कारेगावजवळ झालेल्या अपघातात भोंडवे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील चौघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली यावेळी अश्रूंचा बांध फुटला.
बुधवारी (ता. २२) गुरुकुल परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगळवारी अपघात झाल्यानंतर सुदाम भोंडवे, पत्नी सिंधुताई भोंडवे, सून कार्तिकी भोंडवे, नात आनंदी भोंडवे यांचे पार्थिव बुधवारी डोमरी येथे गुरुकुल परिसरात आणण्यात आले. गुरुकुलासमोर अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवले होते. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले. ठिकठिकाणाहून आलेल्या शेकडो नागरिकांनी साश्रू नयनांनी भोंडवे कुटुंबातील चौघांना अखेरचा निरोप दिला.
दरम्यान, सुदामकाकांनी सुरू केलेले हे कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढे अविरत सुरू ठेवले जाईल. काकांनी दोन गोष्टी दिल्या प्रेम, आणि खरेपणा. काकांनी दिलेली ही दोन मूल्ये आपण आत्मसात करून त्यांचे कार्य पुढे नेऊ, असा विश्वास अश्विन भोंडवे यांनी या वेळी दिला. त्यांचा संवाद अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
COMMENTS