सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : रंगोत्सव सेलिब्रेशन अंतर्गत उत्सव रंगांचा हि इंटरनॅशनल लेव्हल आर्ट कॉम्पिटिशन नुकतीच...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : रंगोत्सव सेलिब्रेशन अंतर्गत उत्सव रंगांचा हि इंटरनॅशनल लेव्हल आर्ट कॉम्पिटिशन नुकतीच मुंबई येथे पार पडली.
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट राजुरी संचलित समर्थ गुरुकुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.सदर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये यश संपादन करत समर्थ गुरुकुल च्या यशामध्ये मोलाची भर घातल्याचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी सांगितले.
हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सारी वैभव आहेर या विद्यार्थिनीला आर्ट मेरिट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. वैष्णवी राजाभाऊ ढोबळे, सानिका मल्हारी मेहेर, श्रीनिका वल्लभ शेळके या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले.
चित्रकला स्पर्धेत श्रीनिका वल्लभ शेळके हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. श्रीशैल विशाल आहेर, साहस कुलदीप वैद्य, परिनिता महेश विश्वासराव, जुनेद जावेद पठाण, समृद्धी विवेक शेळके, भांबेरे आर्यन गोरक्ष, श्रेयन बाळासाहेब औटी, अमृता सतीश पाडेकर या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
यशश्री हेमंत औटी,प्रणव संतोष बांगर, किमया विशाल आरोटे या विद्यार्थ्यांना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.
टॅटू मेकिंग स्पर्धेत प्रिया सोमनाथ राजदेव हिला सुवर्ण पदक तर श्रुजन संजय शेलार हिला रौप्य पदक मिळाले.
या विद्यार्थ्यांना कला शिक्षिका दिप्ती चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS