पुणेः बिल्डींगचे बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरी करणारे टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस स...
पुणेः बिल्डींगचे बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरी करणारे टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८५४ / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही कॅमेरे व तांत्रिक विश्लेषण करीत असताना पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांना सदरचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालकाने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याची माहीती मिळाली.
त्यांनी सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने त्याचे साथीदार दत्ता धनाजी पाटोळे २. साहील दत्ता ढावरे व आणखीन दोन विधीसंघर्षीत वालका असे सर्वांनी मिळून २०/१२/२०२२ रोजी पहाटे ०३.०० वा चे सुमारास जांभुळवाडी रोड, लिपाणे वरती, ब्ली कोस्ट बिल्डींगचे पाठीमागील मोकळ्या जागेमधुन बिल्डींगचे कामकाजाच्या प्लेटा चोरी केल्या असल्याची कबुली दिली.
आरोपी १) दत्ता धनाजी पाटोळे वय २० वर्षे, रा. तळजाई वसाहत, गल्ली नंवर ४४, पदमावती, पुणे, २) साहील दत्ता ढावरे, वय १९ वर्षे, रा. तळजाई वसाहत म्हसोवा मंदीरजवळ, पदगावती, पुणे यांना गुन्हयामध्ये अटक करून त्यांचेकडून गुन्हयातील चोरी केलेल्या १,१०,०००/- रुपये (सध्याच्या बाजारभावानुसार ) किंमतीच्या एकुण १५० लोखंडी प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई श्रीमती स्मार्तना पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलिस स्टेशनकडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, तसेच पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS