विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने दिनां...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने दिनांक २५/०१/२०२३ या रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करीत असताना प्रा. सौ. अनिशा दुराफे यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना मतदानासबंधी शपथ दिली. या कार्यक्रमासाठी निवडणूक नायब तहसीलदार मा. श्री. सुधीर वाघमारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. श्री. सुधीर वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची माहिती व लोकशाहीचे रक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिपेंद्र उजगरे यांनी आपल्या मनोगतात प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम रसाळ,प्रा. मयूर चव्हाण, प्रा. अनिशा दुराफे, प्रा. अंकिता वाळुंज व युथ आयकॉन कु. आदिनाथ कुमकर यांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, उपप्राचार्य व निवडणूक नायब तहसीलदार यांच्या हस्ते जुन्नर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड संजय शिवाजीराव काळे व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिपेंद्र उजगरे , अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा डॉ. महादेव वाघमारे या सर्वांचे या कार्यक्रमासाठी बहुमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा विक्रम रसाळ, प्रा. मयूर चव्हाण, प्रा. अनिशा दुराफे, प्रा. अंकिता वाळुंज, श्री. स्वप्नील दप्तरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS