पंढरपूर : पंढरपूर शहरात एका दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. मन हेलावून टाकणारी घटना घडल्यामुळे एकच खळबळ उड...
पंढरपूर : पंढरपूर शहरात एका दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. मन हेलावून टाकणारी घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महात्मा फुले चौकात कृष्णा तीम्मा धोत्रेचा शौचालयजवळ १0 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. अनेक वर्षे बंद असलेल्या शौचालय जवळ छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे. कृष्णा असे या मुलाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे, कृष्णाची छाती पूर्ण फाडलेली आहे. हाताला दुखापत झाली आहे. याबाबतचा तपास सुरू आहे.
दरम्यान, कृष्णाची नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि त्याचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. पोलिसांनी कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. अहवालानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. कृष्णाचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
COMMENTS