आरोग्य टिप्स - सध्या थंडीचा मौसम सुरू आहे. देशात अनेक ठिकाणी थंडीची लाट सुरू आहे. काही ठिकाणी तर पारा इतका घसरला आहे की लोकांना बाहेर पडणे...
आरोग्य
टिप्स - सध्या थंडीचा मौसम सुरू आहे. देशात अनेक ठिकाणी थंडीची लाट सुरू आहे. काही
ठिकाणी तर पारा इतका घसरला आहे की लोकांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तसेच
सध्या थंडीमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. देशात अशा अनेक घटना
समोर आल्या आहेत.
थंडीत
ही काळजी घ्या हार्ट अटॅकचा धोका होईल कमी
– तुम्हाला
जास्त अल्कोहोल पिण्याची सवय असेल तर त्यावर नियंत्रण मिळवा.
– धुम्रपान
करण्याची सवय असलेल्या लोकांनीही ते कमी केले पाहिजे.
– झोप
पूर्ण न होणे हेही हार्ट अटॅकचे कारण होऊ शकते. शरीरासाठी सात ते आठ तासांची झोप
आवश्यक असते. त्यामुळे हृदय चांगले राहते.
– तुम्ही
घेत असलेल्या आहारावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आहारात मीठ, साखर आवश्यक तेवढे घ्यावे.
– दुसरे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम. व्यायाम हा दररोज केला पाहिजे. दररोज किमान
अर्धा ते पाऊण तास व्यायाम केलाच पाहिजे.
–
COMMENTS