आरोग्य टिप्स - शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता असल्यास चक्कर येते तसेच कोणतेही काम नीट करता येत नाही. काम करताना सतत त्रास जाणवतो. परंतु यावर ...
आरोग्य टिप्स - शरीरात हिमोग्लोबीनची
कमतरता असल्यास चक्कर येते तसेच कोणतेही काम नीट करता येत नाही. काम करताना सतत
त्रास जाणवतो. परंतु यावर काही उपाय आहेत. आपण जो आहार घेतो त्याने हिमोग्लोबिनची
पातळी काही प्रमाणात वाढते परंतु त्यापेक्षा जर कमी असेल तर काही लोहयुक्त पदार्थांचे
सेवन करा.
– खजूर- ज्या लोकांना हिमोग्लोबीनची कमतरता जाणवते अशा लोकांनी खजूर खाल्ले पाहिजेत. कारण खजूरात लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. खजूर खाल्याने ॲनिमियासारखे आजार टाळता येतात.
– तिळाच्या बिया- तिळाच्या बिया खाल्ल्यानेही हिमोग्लोबीनची पातळी वाढते. तिळाच्या बियांमध्ये लोह, फोलेट, फ्लेव्होनॉइड्स विविध पोषक घटक असतात. त्यामुळे हिमोग्लोबीन वाढते.
– राजगिऱ्याची पाने -राजगिऱ्याची पाने खाल्ल्यानेही शरीरातील हिमोग्लोबिनची लेव्हल वाढण्यास मदत होते.
COMMENTS