क्राईमनामा Live : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी सुभाष दाते तर तक्रार निवारण समिती सदस्य पदी ललित गाढवे, ...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी सुभाष दाते तर तक्रार निवारण समिती सदस्य पदी ललित गाढवे, तानाजी तळपे व उत्तम आरोटे यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेचे सभापती विजय लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा संपन्न झाली.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व अभिनंदन करण्यात आले. सत्कार समारंभ सभेचे अध्यक्ष सुदाम ढमाले हे होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डुंबरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विनायक ढोले, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडी अध्यक्षा सुशिलाताई डुंबरे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विकास मटाले, नेते सदू मुंढे, महिला आघाडी अध्यक्षा स्वप्नजा मोरे, कार्याध्यक्ष सयाजी चिखले, कोषाध्यक्ष शरद वारुळे, सरचिटणीस संतोष पानसरे, उपसभापती दत्तात्रय घोडे, मानद सचिव ज्ञानदेव गवारी, खजिनदार अंबादास वामन, एकल शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश देठे, माजी सभापती साहेबराव मांडवे, मावळते तक्रार निवारण समिती सदस्य भरत बोचरे यांनी नवनिर्वाचित तज्ञ संचालक व तक्रार निवारण समिती सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक सचिन मुळे यांनी केले. सत्कार समारंभाच्या निमित्ताने सभासद बंधू भगिनी, शिक्षक संघ शिलेदार, पतसंस्थेचे संचालक, माजी संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार कार्याध्यक्ष सयाजी चिखले यांनी मानले.
COMMENTS