सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : १४ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धा नुकतीच...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : १४ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धा नुकतीच नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव येथे पार पडली.त्यामध्ये समर्थ गुरुकुल बेल्हे (बांगरवाडी) च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कमिगिरी केल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
काव्य गुंजाळ याने ४८ ते ५० वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
आर्यन गायके याने ४४ ते ४६ वजनी गटात द्वितीय क्रमांक तर संस्कार शिंदे याने ३६ ते ३८ वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवला.
अभिरथ घाडगे याने ३४ ते ३६ वजनी गटात तृतीय क्रमांक तर राज दाते याने २८ ते ३० या वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवला.
सदर विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक किरण वाघ,नवनाथ निर्मळ यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत, डॉ.शिरीष गवळी, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले.
COMMENTS