क्राईमनामा Live : जुन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) तालुका उपाध्यक्षपदी जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे गावचे सुरेश ...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) तालुका उपाध्यक्षपदी जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे गावचे सुरेश खरात यांची निवड झाली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट राक्षे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे, वसंत साळवे ( मातंग एकता संघटना ), सुखदेव खरात, प्रविण लोखंडे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकारी यांच्या वतीने खरात यांची जुन्नर तालुक्याच्या आर.पी.आय. उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे.
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे गावचे खरात यांना बौध्द विकास मंडळ बोतार्डे व ग्रामस्थ तसेच विविध संघटनांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
COMMENTS