विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर,पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर,पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने दिनांक 21/12/2022 ते 27/12/2022 या रोजी दातखिळेवाडी येथे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत युवकांचा ध्यास व ग्राम, शहर विकास” विशेष श्रमसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सात दिवशीय शिबिरामध्ये ग्राम स्वच्छता, सामाजिक आर्थिक कुटुंब सर्वेक्षण, आभा कार्ड सर्वेक्षण, नव मतदार नोंदणी, मतदान कार्डांची दुरुस्ती, मतदान कार्डास आधार लिंक करणे, ई-पिक पाहणी, संजय गांधी निराधार योजना व इतर विविध प्रकारची कामे करण्यात आली.
दुपार सत्रामध्ये विविध विषयांवर व्याख्यानमाला आयोजित केली होती,सदर व्याख्यान मालेतील विषय राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान, विविध प्रशासकीय योजनांची माहिती, शासकीय योजनेतून समाजकार्य, पर्यावरण जनजागृती, राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व, या विषयांवर व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करून त्यांचे प्रबोधन केले. त्याचबरोबर या शिबिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे मनोगत, गटचर्चा विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण विकास कार्यक्रम, आरोग्य विषयक चर्चा, पथनाट्यांद्वारे व्यसनमुक्ती जनजागृती, पर्यावरण जनजागृती, मतदान जनजागृती अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यात आला.
या संपूर्ण शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. ॲड.संजय शिवाजीराव काळे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. दीपेंद्र उजगरे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. डॉ.महादेव वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरासाठी दातखिळेवाडी येथील सरपंच श्री. राहुल दातखिळे, उपसरपंच श्री.विकास दातखिळे, जि.प.प्रा.शाळा मुख्याध्यापक वसंत फापाळे, श्री.शरद दातखिळे, शुभम दातखिळे, प्रतीक दातखिळे, नवनाथ भागवत, अमित दातखिळे व इतर ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.विक्रम रसाळ, प्रा.स्वप्निल घोडेकर, प्रा.मयूर चव्हाण, प्रा.अनिशा दुराफे, प्रा.अंकिता वाळूंज यांनी केले, त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचारी सिताराम शळकंदे, राजू गवळी व सर्व स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.
COMMENTS