प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय दिनांक २ डिसेंबर २०२२ या रोजी ग्रंथालय व डायमंड पब्लिकेश...
प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय दिनांक २ डिसेंबर २०२२ या रोजी ग्रंथालय व डायमंड पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले आहे या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मा.अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सुरुवातीस सकाळी ग्रंथ दिंडी ही महाविद्यालयातील ग्रंथालयापासून ते जुन्नर बस स्टॅन्ड ते पुन्हा महाविद्यालयापर्यंत काढण्यात आली, या ग्रंथदिंडीसाठी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थिनी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ग्रंथ, लेझीम व ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.ॲड. संजय शिवाजीराव काळेसाहेब इतर पदाधिकारी व मान्यवर यांचे संपूर्ण मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.डी.व्ही.उजगरे, उपप्राचार्य प्रा.डॉ. महादेव वाघमारे, प्रभारी प्रबंधक सौ.मनिषा कोरे,प्रभारी ग्रंथपाल सौ.वंदना चव्हाण, व डायमंड प्रकाशनाचे प्रमुख श्री. दत्तात्रय पाष्टे यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती लाभली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम रसाळ, प्रा. डॉ. वंदना नढे, प्रा. मयूर चव्हाण, प्रा. अंकिता वाळूंज, प्रा.अनिषा दुराफे व विद्यार्थिनी मंच अधिकारी प्रा. डॉ. सुप्रिया काळे यांनी केले.
COMMENTS