क्राईमनामा Live : २६ नोव्हेंबर ७३ वा भारतीय संविधान दिन काल शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पंचायत समिती जुन्नर येथे विविध मान्यवरांच...
क्राईमनामा Live : २६ नोव्हेंबर ७३ वा भारतीय संविधान दिन काल शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पंचायत समिती जुन्नर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जुन्नर न्यायालयाचे न्यायाधिश सकपाळ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे व बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संविधान उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जुन्नर पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी संदिप घायवट व बाळासाहेब मस्करे यांनी केले होते.
COMMENTS