सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी विजय लोखंडे, उपसभापतीपदी द...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी विजय लोखंडे, उपसभापतीपदी दत्तात्रय घोडे खजिनदारपदी अंबादास वामन,मानद सचिवपदी ज्ञानेश्वर गवारी तर सरचिटणिसपदी विवेकानंद दिवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या राजा शिवछत्रपती सभागृहात निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.
संस्थेच्या शताब्दी वर्षात कारभार पाहण्याची संधी मिळालेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने भरजरी फेटा बांधून, शाल व पुष्पहार घालून तसेच पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व अभिनंदन करण्यात आले. सदर प्रसंगी संघ शिलेदारांनी फटाके उडवून शिक्षक संघाचा जयजयकार केला. सत्कार समारंभ सभेचे अध्यक्ष मावळते सभापती संदीप थोरात होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डुंबरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विकास मटाले, नेते सदू मुंढे, कार्याध्यक्ष सयाजी चिखले, कोषाध्यक्ष शरद वारुळे, सरचिटणीस संतोष पानसरे, प्रवक्ते अन्वर सय्यद, प्रसिद्धी प्रमुख दिनेश मेहेर, एकल शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश देठे, माजी सभापती साहेबराव मांडवे, तक्रार निवारण समिती सदस्य भरत बोचरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, मानद सचिव आणि खजिनदार यांनी सर्व सभासदांच्या आर्थिक हिताला व पतसंस्थेच्या प्रगतीला प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती वैभव सदाकाळ यांनी केले. सत्कार समारंभाच्या निमित्ताने सभासद बंधू भगिनी, शिक्षक संघ शिलेदार, पतसंस्थेचे माजी पदाधिकारी, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार माजी सभापती वसंत फापाळे यांनी मानले.
COMMENTS