क्राईमनामा लाईव – शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांन...
क्राईमनामा लाईव – शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी पिंपळगाव जोगा येथील आळू प्राथमिक शाळेला भेट दिली.
यावेळी शालेय परिसर, सुंदर वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी
संगणक, टिव्ही, वॉटर फिल्टर अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल या गावचे सरपंच,
उपसरपंच व ग्रामसेवक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक पालक सर्वांचे
अभिनंदन केले.
या बरोबरच प्रसाद यांनी विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या,
मुलांनी यावेळी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. मुलांना जवळ घेऊन फोटो काढले.
या कार्यक्रमप्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी
शरदचंद्र माळी, गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख
सुरेश भवारी, ग्रामविकास अधिकारी रविंद्र खंदारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
COMMENTS