सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : श्रीक्षेत्र पारुंडे (ता. जुन्नर) येथील श्री ब्रह्मनाथ विद्यालयातील ज्येष्ठ शिक...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live :
श्रीक्षेत्र पारुंडे (ता. जुन्नर) येथील श्री ब्रह्मनाथ विद्यालयातील
ज्येष्ठ शिक्षक कैलास किसन दाभाडे यांना
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा टी. डी. एफ. व पुणे जिल्हा
माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्याचे आमदार संग्राम
दादा थोपटे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने भोर येथे
सन्मानित करण्यात आले. या जिल्हास्तरीय सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील तेरा
तालुक्यातील प्रत्येकी पाच शिक्षकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,
शाल
,श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषदेचे सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ,महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे
कार्याध्यक्ष जी.के.थोरात,पुणे जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष
दत्तात्रय अरकडे,विश्वस्त के.एस.ढोंमसे, सचिव पंकज घोलप, स्वागत
अध्यक्ष धोंडीबा कुमकर आदी मान्यवर
उपस्थित होते .दाभाडे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल श्री ब्रह्मनाथ सेवा
मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश पुंडे , विद्यालयाचे मुख्याध्यापक याकुब शेख,
सर्व
संचालक ,सहकारी वृंद यांनी अभिनंदन
केले.
COMMENTS