सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) मध्य...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) मध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवी नंतरचा अभ्यासक्रम ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी एस्सी केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी,(गणित व भौतिकशास्त्र सोडून बाकीचे), बी एस्सी फिजिओथेरपी, बी फार्मसी,बी व्ही एस्सी सी,बी ए एम एस, बी यु एम एस, एम बी बी एस, डी एच एम एस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त, लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो. प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सहाय्यक अभदा तंत्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी, खाजगी किंवा शासकीय हॉस्पिटल मध्ये प्रयोग शाळा सहाय्यक, पर्यवेक्षक म्हणून नोकरीची संधी,विषाणू संशोधन संस्थांमध्ये, रक्तपेढी, लस उत्पादन संस्था, फार्मास्यूटिकल्स कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेकविध संधी उपलब्ध असल्याचे प्रा.राजीव सावंत यांनी सांगितले.
सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी डॉ.संतोष घुले-८३१९६३२२४८,प्रा.सचिन दातखिळे-९९६०६०१५५३,प्रा.शुभम पाटे-८९५६८७७२७६ यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
COMMENTS