सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट राजुरी संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाड...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट राजुरी संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे गेली १५ वर्षांपासून प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रा.प्रदिप गाडेकर यांना नुकताच यंदाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक व प्रशासकीय अधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्ञानज्योती बहू उद्देशीय संस्था टाकळीभान, श्रीरामपूर या संस्थेच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,संस्था यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्यात येते.
हा पुरस्कार पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहिबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते व पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके,पुणे जिल्हा माजी शिक्षण संचालक दिनकर राव टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन प्रदान करण्यात आला.
त्याचप्रमाणे रोटरी क्लब नारायणगाव व विघ्नहर मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर-पुणे जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक व प्रशासकीय अधिकारी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निवृत्त सचिव शहाजी ढेकणे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, डॉ सदानंद राऊत, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.पंजाबराव कथे, रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे अध्यक्ष डॉ. श्रीकांत फुलसुंदर, नंदकुमार चिंचकर, रविंद्र वाजगे,प्रोजेक्ट डायरेक्टर रामभाऊ सातपुते आदि मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी प्रा.प्रदिप गाडेकर यांना पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांचे हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.सन २०१९ मध्ये स्व. जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ वि वि चिपळूणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत अधिकारी म्हणून गौरविलेले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमा अंतर्गत दहावी व बारावी नंतरची प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, कागदपत्रे माहिती, शिष्यवृत्ती माहिती इ विषयीचे मार्गदर्शन सातत्याने करत असतात. जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सामाजिक, शैक्षणिक व इतर ऑनलाईन वेबिनार सक्रियपणे राबवत असतात. समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे येथील इंजिनिअरिंग, एम बी ए, बी सी एस या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन तसेच समर्थ पॉलिटेक्निक साठी एन बी ए मानांकन प्रक्रियेसाठी साठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमांतर्गत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे जातींचे दाखले काढून देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. तालुका स्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन तसेच २७ वी बालविज्ञान परिषदेचे आयोजन व नियोजन यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत यशस्वीरित्या पर पाडला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत
विद्यार्थी हिताच्या व समाजपयोगी विविध उपक्रमांचे आयोजनामध्ये प्रा. प्रदिप गाडेकर नेहमीच अग्रभागी असतात.
शैक्षणिक क्षेत्रातील आजपर्यंत केलेल्या भरीव योगदानाबद्दल व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन वरील पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे.समर्थ शैक्षणिक संकुला च्या यशस्वी वाटचालीमध्ये प्रा.प्रदिप गाडेकर यांचा मोलाचा सहभाग असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी म्हटले आहे.
संस्थेचे अध्यक्ष वसंत राव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहल ताई शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे तसेच संकुलातील सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी प्रा.प्रदिप गाडेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS