सहसंपादक:-प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे (बांगरवाडी) या सी बी ए...
सहसंपादक:-प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे (बांगरवाडी) या सी बी एस ई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इकोफ्रेंडली गणेशा' या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
गणेशोत्सवाचे मांगल्य जपले जावे आणि पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या तुलनेत शाडूची मूर्ती पाण्यात लवकर विरघळते. त्यामुळे विसर्जना नंतर होणारे पाणी प्रदूषण टळते. जल-वनस्पती,प्राणी यांची हानी होत नाही.
इकोफ्रेंडली गणेशा या उपक्रमाबद्दल माहिती देताना प्राचार्य सतीश कुऱ्हे म्हणाले कि, या उत्सवाचे पावित्र्य व मांगल्य अबाधित राहावे म्हणून बालचमुंनी केवळ शाडू मातीच्याच मूर्ती शाळेमध्ये बनवल्या. तसेच सुबक, आखीव रेखीव, नीट-नेटके आणि हुबेहूब रंगकाम या मूर्तिना करून त्यामध्ये आपल्या मनातील भाव मूर्तित आणण्याचा निरागस प्रयत्न या लहान विद्यार्थ्यांनी केलेला दिसून येतो.म्हणजेच विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक असा शाडूच्या मुर्त्यांचा प्रकल्प तयार करून पर्यावरणाचा संदेश तर दिलाच पण त्याचबरोबर व्यवहारिकतेचे धडेही गिरवले असल्याचे प्राचार्य कुऱ्हे यांनी सांगितले.
या उपक्रमात ७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मिळून ५० गणेश मूर्ती बनविल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
दिप्ती चव्हाण व वैशाली जाधव यांनी विद्यार्थ्यांना हा प्रकल्प साकार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.
या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके, सचिव विवेक शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी विशेष कौतुक केले आहे.
COMMENTS