क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथील ग्रामपंचायतीतील कायमस्वरूपी कर्मचारी संतोष शिवराम शिंदे हे गेले कित्येक वर्षांपासून त्...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथील ग्रामपंचायतीतील कायमस्वरूपी कर्मचारी संतोष शिवराम शिंदे हे गेले कित्येक वर्षांपासून त्यांच्या मागील थकबाकीसाठी ग्रामपंचायतीला हातजोडणी करत आहेत मात्र ग्रामपंचायत वसूली नसल्याचे कारण देत त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. शिंदे हे मागील पंधरा दिवसांपासून आजारी आहेत, त्यांना रक्ताच्या बाटल्या भरायला सांगितलेल्या आहेत मात्र ग्रामपंचायत बोतार्डे यांना त्यांची साधी दया येऊ नये यासरखं दुर्दैव नाही, ग्रामपंचायत बोतार्डे येथील सरपंच मच्छिंद्र केदार यांना परिस्थिती सांगूनदेखील शिंदे यांना त्यांचा राहणीमान भत्ता मिळू शकत नसेल तर त्यांचा घरखर्च, दवाखान्याचा खर्च कसा भागवायचा हा त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिलेला आहे.
सध्या त्यांची परिस्थिती नाजूक आहे ग्रामपंचायतीकडे त्यांचे हक्काचे पैसे भिक मागितल्यागत मागायचे तरी किती दिवस? शिंदे यांना त्यांचे हक्काचे पैसे ग्रामपंचायत बोतार्डे यांनी त्वरीत देण्याची तजवीज करावी अन्यथा ते पुढील पावले लवकरच उचलणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
COMMENTS