प्रा.सतिश शिंदे- मुख्य संपादक क्राईमनामा Live : देवळे गावी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवन चरित्रावर एका लघुपटाच्या निर्मितीचे उ...
प्रा.सतिश शिंदे- मुख्य संपादक
क्राईमनामा Live : देवळे गावी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवन चरित्रावर एका लघुपटाच्या निर्मितीचे उद्घाटन दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आले.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आजपर्यंत अनेक क्रांतिकारक यांच्या लढ्याची आजपर्यंत इतिहासामध्ये नोंद करण्यात आली मात्र, आदिवासी समाजातील क्रांतिकारक बंडकरी यांची नोंद जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आली. परंतु काळाच्या ओघात निसटलेल्या गोष्टी पुन्हा एकदा नव्याने पुनर्जीवित करण्यासाठी आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या चित्रफिती मधून गुंडशाही सावकारशाही मध्ये माजलेले सावकार विशेषता "भन्साळी सावकार" यांचा शिरच्छेद कसा करण्यात आला यावर आधारित हा लघुपट आहे. या लघुपटामध्ये अनेक कलाकारांचा सहभाग लाभलेला असून फिल्म इंडस्ट्रीतील तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते प्रत्येक घरातून एक दोन सदस्य क्रांतीच्या बंडामध्ये नेहमीच सहभागी होत असत. सदर लघुपट हा "बाडगीची माची" या पुस्तकातील कथेवर आधारित असून यामध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टींना चित्रफिती मधून समोर आणणार नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच यासंदर्भात विशेष दखल घेण्यात आलेली आहे. यावेळी देवळे गावचे पोलीस पाटील व सर्व गावकरी यांचे सहकार्य लाभले मोठ्या प्रमाणात लाभले सर्व टीमने गावकऱ्यांचे मनापासून आभार मानले सदर लघुपटाचे दिग्दर्शन -डायरेक्टर संजय भाऊ भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली लघुपटाची सुरुवात करण्यात आली.
कलाकार-
बाळासाहेब धराडे.
रवींद्र बोराडे..
जगन्नाथ वाजे.
तुषार वाळकोळी.
भाऊ कुंदे, राहुल भांगरे.
रामदास गारे, विशाल धराडे, तुषार डावखर, गणेश उंडे, आश्लेषा असवले, छाया खंडे, ऋतिक धराडे, धनाजी बोराडे, दुलाजी बोराडे, कावेरी बोराडे, माधुरी घुटे, अपेक्षा शिंदे, फसाबाई घुटे, मनाबाई बोराडे, भुगाबाई बोराडे, विजया बोराडे, ठकुबाई बोराडे, लिलाबाई बोराडे, सुरेखा बोराडे, नीता बोराडे, जानकु बाई बोराडे, भागुबाई बोराडे
इत्यादी कलाकार सहभागी आहेत.
COMMENTS