सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील सी ...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील सी बी एस ई या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये दहिहंडीचा उत्सव मोठ्या आनंदाने, जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा, पेंदया आणि सवांगाड्यांची वेशभूषा धरण केल्या होत्या. हातात बासरी घेऊन विविध वेशभूषेने नटलेल्या बाळ गोपाळांनी एकावर एक असे चार थर करत दहीहंडी फोडली.
पूर्ण परिसर बासरीच्या सुमधुर आवाजाने प्रफुल्लित झाला होता.तोरण,माळा,फुले यांनी सुशोभीकरण करून राधा, गौळण यांच्या गाण्यावर बाल चमुन्नी ताल धरला.
सर्वांना एकत्रित करून सामाजिक ऐक्याचा मंत्र काल्यातून जोपासला गेला.
यावेळी गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
या उत्सवाला संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके, सारिका ताई शेळके, सचिव विवेक शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे, विश्वस्त वल्लभ शेळके, गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, संकुलातील सर्व प्राचार्य गुरूकुलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS