हमीरपूर (उत्तर प्रदेश): काही युवकांनी प्रियकरासमोरच युवतीला नग्न केले आणि तिचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी...
हमीरपूर (उत्तर प्रदेश): काही युवकांनी प्रियकरासमोरच युवतीला नग्न केले आणि तिचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
हमीरपूर जिल्ह्यातील एका जंगलात ही घटना घडली आहे. सहा युवकांनी युवतीला तिच्या प्रियकरासमोरच नग्न केले आहे. दोघांना मारहाण करून युवतीचा नग्नअवस्थेतील व्हिडिओ शूट केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सहा पैकी तिघांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमीयुगल अज्ञातस्थळी जाऊन बसतात. काही टोळकी तिथे जाऊन प्रेमीयुगलाला मारहाण करून त्यांच्याकडून पैसे, सोने लुबाडतात. याप्रकरणी यापूर्वी अनेकदा टोळक्यांविरोधात कारवाया केल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील प्रेमीयुगलाच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. तिघांना अटक करण्यात आली असुन, उर्वरीत तिघांचा शोध सुरू आहे.
COMMENTS