सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) मोहरम हा सत्य व मानवते करिता दिलेल्या बलिदानाची पवित्र स्मृती. क्राईमनामा Live : चिंचोली ( काशीद ) ता ...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
मोहरम हा सत्य व मानवते करिता दिलेल्या बलिदानाची पवित्र स्मृती.
क्राईमनामा Live : चिंचोली ( काशीद ) ता जुन्नर येथे मोहरम उत्सव अनेक वर्षापासून हिंदू - मुस्लिम सहभागी होऊन अत्यंत उत्साहात ,शांततेने संपन्न झाला. या उत्सवाच्या निमित्ताने शहरात राहणारे लोकही परिवारासह नवस पूर्ण करण्यासाठी व दर्शनासाठी उपस्थित असतात. गत दोन वर्षाच्या करोनाच्या काळात सण, उत्सव, मिरवणुकीला बंदी होती. परंतु अनेक निर्बंध पाळत हजारो लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते.
"हसन हुसैन दुल्हाह" च्या निनादात गुळ, पेढे यांचा प्रसाद वाटत सरबताचा लाभ घेत अत्यंत शांततेत मिरवणूक पार पडली. इस्लामी कालगणनेनुसार वर्षाचा पहिला महिना मोहरम म्हणून ओळखला जातो. इस्लामी इतिहासात करबला च्या दुःखद आठवणींनी या महिन्याचा प्रारंभ होतो. प्रेषित पैगंबर साहेबांचे नातू इमाम हुसैन यांनी यजिद च्या अधर्म कृत्याला विरोध केल्याने करबलाच्या मरू भूमीवर असंख्य नातेवाईक व सहकाऱ्यांसह सत्य धर्मासाठी बलिदान केले. तोच हा शहीद दिन, मोहरम महिन्याचा दहावा दिवस. मोहरम महिन्याच्या दहा तारखेला मुस्लिम समाजाच्या वतीने ताजिया, पंजे यांच्यासह मिरवणूक काढून सूर्यास्तापूर्वी अलविदा केले जाते.
या मिरवणुकीच्या निमित्ताने चिंचोली गावचे सरपंच खंडू काशीद, उपसरपंच इम्रान चौगुले, पोलीस अधीक्षक नवनाथ वाजे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतू डोळस, विकास डोळस, बिलाल भाई चौगुले, हमदर्द मुस्लिम जमातीचे अध्यक्ष मुबारक पटेल, मस्जिद इनाम ट्रस्टचे अध्यक्ष इस्हाक चौगुले, सेक्रेटरी एजाज पटेल, मुंबई विभागाचे अध्यक्ष नियाज पटेल, पुणे विभाग प्रमुख आनिस पटेल, मुबारक शेख, बशीर भाई शेख, फारुख पटेल, निसार पटेल, प्रा.राहुल डोळस आदी मान्यवरांसह, परिसरातील मोठ्या संख्येने मुस्लिम - हिंदू बांधव, भगिनी उपस्थित होते. मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली.
COMMENTS